Sheli Palan Yojana 2024 | शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2024 | 75% अनुदान मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज

Spread the love

Sheli Palan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो “सरकारी योजना ब्लॉग” मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याने राज्यातील जास्त लोकसंख्या तर शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी शेती बरोबर शेतीसोबत इतर जोडधंदा करून अधिक नफा कामावण्यावर अधिक भर आहे. जसे – शेळी पालन, गाई पालन, कुकूट पालन असे अनेक जोडधंदे करून शेतकरी शेतीपेक्षा जास्त नफा कमावतो आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना 2024 देखील सुरु केली आहे. 

कारण राज्यातील शेतकरी पशुपालन व्यवसाय ला एक अत्यंत महत्वाचा पारंपरिक काळापासून चालत आलेला व्यवसाय असल्याने राज्यातील शेतकरी शेळी पालन करण्यास अधिक पसंद करत आहेत. तर मित्रांनो तुम्हीही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असाल आणि शेती करणे परवडत नसल्याने शेतीसोबत इतर कोणतातरी जोडधंदा करू पाहत असाल तर शेळी पालन हा तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि शेतीपेक्षा जास्त नफा कमावून देणार व्यवसाय योग्य ठरणार आहे.

आज आपण या ठिकाणी शेळीपालन व्यवसाय करून अधिक पैसे कसे कमवायचे? आणि हा शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकार देखील मदत करत असल्याने राज्य शासनाच्या शेळीपालन योजना बदल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी वारंवार नवनवीन योजना राबवित आहे हे तर आपल्याला माहिती आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेळी पालन सुरु करण्यासाठी तर अनुदान देत आहे त्याचबरोबर शेळी पालन करण्यासाठी लागणारे शेड बांधण्यासाठी देखील अनुदान देत आहे.

आजच्या या लेखच्या मदतीने आपण शेळी पालन करण्यासाठी सुरु केलेल्या Sheli Palan Yojana 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शेळी पालन सुरु करण्यासाठी लागणारे शेड अनुदान योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी शेळी पालन शेड अनुदान योजनाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. 

शेळी पालन व्यवसाय 

मित्रांनो शेळीपालन हा खूप जास्त काळापासून केला जात असलेला पारंपरिक व्यवसाय आहे हे तर आपल्याला माहिती आहेच परंतु या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी आणि फायदा खूप जास्त आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांची शेती सोबत जोडधंदा मध्ये शेळी पालन ला अधिक पसंद करतात. 

हे वाचा – Old Age Pension Yojana 2024 Latest – महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2024 ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्र, लाभार्थी पात्रता.

राज्यात अंडी, मास ला अधिक मागणी असल्याने शेतकरी कुकूट पालन किंवा शेळी पालन व्यवसाय करत आहेत. तसेच शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्यातील शेतकरी उस्मानाबादी, संगमनेर आणि ब्लॅक बंगाल इत्यादी शेळ्यांच्या जातीची निवड करतात. 

उस्मानाबादी, संगमनेर किंवा ब्लॅक बंगाल यापैकी एक कोणत्याही एका जातीच्या शेळी पालन केल्यास फायदेशीर ठरत आहे. कारण या जातीच्या शेळी कोणत्याही वातावरणात स्वतःला जुळवून घेतात आणि यांना खर्च पण खूप कमी येतो. त्याचबरोबर या शेळ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण देखील अत्यंत कमी आहे. 

शेळी पालन योजना 2024 – Sheli Palan Yojana 2024

राज्यातील शेतकऱ्यानाची परिस्थिती हलाकीची असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना स्वतःचा शेळी पालन व्यवसाय सुरु करणे कठीण होत असल्याचे लक्षात घेता राज्य सरकारने Sheli Palan Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेळी पालन शेड अनुदान योजनासोबत शेळी खरेदी साठी देखील सरकार 75% अनुदान देण्याचा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. 

या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे स्वतःचे शेळी पालन सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी शेळी पालन करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. 

Sheli Palan Yojana उद्देश 

  • शेतीसोबत इतर जोडधंदा करता येणार आहे. 
  • त्याचबरोबर कमी गुंतवणूक करून अधिक नफा मिळवता येणार आहे. तसेच शेळी पालन सुरु करण्यासाठी 75% अनुदान देखील वाटप केले जाणार आहे. 
  • शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. 

शेळी पालन योजना आवश्यक कागदपत्र – Required Documents Of Sheli Palan Yojana 

Sheli Palan Yojana चा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असणार आहेत. आवश्यक कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे. 

  • आधार कार्ड 
  • मतदान कार्ड 
  • 7/12 आणि 8अ 
  • रेशन कार्ड 
  • जॉब कार्ड 
  • उत्पन्न दाखला 
  • रहिवाशी दाखला 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • बँक पासबुक 

वरील सर्व कागदपत्र असतील तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे वरील सर्व कागदपत्र आवश्यक आहेत.

शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2024.

शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो. ज्या शेतकऱ्यांनां ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण येत आहे असे शेतकरी ऑफलाईन अर्ज देखील करू शकतात. 

Sheli Palan Yojana Online Apply 

Step 1:- शेळी पालन योजनाचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी MahaBMS या अधिकारिक पोर्टलला भेट द्या. खाली तुम्हाला पशुपालन असे लिहिले दिसेल यावर क्लिक करा. 

Step 2:- तुमच्यसमोर लॉगिन आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि OTP मागितला जाईल. मोबाईल नंबर आणि OTP टाकून “रजिस्टर” या बटानावर क्लिक करा. 

Step 3:- आता तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवीन पेज ओपन होईल यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. आणि “Next” या बटनवर क्लिक करा.

Step 4:- आता तुम्हांला कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले जाईल. सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर “अर्ज पूर्ण करा” बटणवर क्लिक करा. 

अश्या प्रकारे आपण घरी बसून मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करू शकतो. 

Sheli Palan Yojana Offline Apply 

शेळी पालन योजनाचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयाची मदत घेऊन ग्रामसेवक यांच्या मदतीने ऑफलाईन अर्ज करू शकतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ग्रामसेवक यांची भेट घेऊन त्यांनी सांगितलेले सर्व कागदपत्र त्यांच्याकडे जमा करा. त्यानंतर काही दिवसांनी ग्रामसेवक तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला सांगतील. 

Sheli Palan Yojana 2024 संबंधित अधिक माहिती

शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2024:- नमुना अर्ज.

शेळी पालन योजना २०२४ अधिकारीक वेबसाईट :- MahaBMS.com

शेळी पालन योजना महाराष्ट्र राज्य हेल्पलाईन नंबर :- 1800-233-0418 / 1962

इतर सरकारी योजना बद्दल संपूर्ण माहिती :- Group Join Now

शेळीपालन योजनेबद्दल नेहमी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न  

शेळी पालन योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून शेळी पालन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sheli Palan Yojana अंतर्गत किती अनुदान वाटप केले जातं आहे?

शेळीपालन सुरु करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना 75% अनुदान वाटप करत आहे.

शेळी पालन सुरु करण्यासाठी कोणत्या जातीच्या शेळीची निवड करणे फायदयाचे ठरत आहे?

शेळी पालन सुरु करण्यासाठी सुरवातीला योग्य जातीच्या शेळी ची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या उस्मानाबादी, सनमनेर आणि ब्लॅक बंगाल यापैकी कोंबत्याही एका जातीच्या शेळीची निवड करून शेळी पालन फायदेशीर करता येऊ शकते.

शेळी पालन योजनेतर्गत अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत?

शेळी पालन योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, 7/12, 8अ, उत्पन्न दाखला आणि रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.

शेळी पालन योजना कोणत्या राज्यात सुरु केली आहे?

शेळीपालन योजना फक्त महाराष्ट्र राज्यात सुरु आहे.

Conclusion 

तर मित्रांनो आज आपण याठिकाणी शेळी पालन योजनेसंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. जसे शेळी पालन योजना काय आहे? कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात? कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करायचा? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळाली असतील. 

आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की

Leave a Comment