PM Awas Yojana Gramin : पीएम आवास योजना ग्रामीण 2024 अर्ज झाले सुरु, असा करा अर्ज

Spread the love

PM Awas Yojana Gramin : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र केंद्र सरकारद्वारे पीएम आवास योजना ग्रामीण लिस्ट (PM Awas Yojana Gramin List) जारी करण्यात आलेली आहे. 2024 मधील अर्थबजेट मध्ये राज्य सरकारने बऱ्याच नवनवीन योजनाची घोषणा केलेली आहे. जसे – लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना अश्या वेगवेगळ्या योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. 

तसेच केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांसाठी वारंवार नवनवीन योजना राबविताना दिसत आहे. त्यातीलच एक आहे PM Awas Yojana Gramin 2024 (पीएम आवास योजना 2024) या योजनेतर्गत केंद्र सरकारने मागील काही दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज मागवले होते. आणि आता केंद्र सरकारने पीएम आवास योजना ग्रामीण यादी (PM Awas Yojana Gramin Yadi) जारी केलेली आहे. 

पीएम आवास योजना ग्रामीण (PM Awas Yojana Gramin) 

केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागवले होते. या योजनेमुळे देशातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा कार्यभार स्विकारल्याने, नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब आणि आर्थिक मागास नागरिकांसाठी स्वतःचे घर बंदण्यास आर्थिक मदत करण्यासाठी 2016 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. 

आतापर्यंत देशातील ग्रामीण भागातील कोट्यावधी गरीब कुटुंबानी या पीएम आवास योजनासाठी अर्ज केलेला आहे. तसेच या योजनेतर्गत बऱ्याच कुटुंबानां स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. 

पीएम आवास योजनेचे मुख्य उद्देश 

देशातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांचे स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे उद्देश समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Awas Yojana Gramin राबविण्याची घोषणा केली आहे. 

ज्या नागरिकांनी या योजनेतर्गत अर्ज केलेला आहे. अश्या नागरिकांची पात्रता यादी केंद्र सरकारद्वारे जारी करण्यात आलेली आहे. या योजनेतर्गत 3 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना पक्के घर बांधून देण्याचे उद्देश समोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजनेची घोषणा केली आहे. 

2016 पासून आतापर्यंत कोट्यावधी गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेद्वारे पक्के घर बांधून देण्यात आलेले आहे. तसेच अजून देखील बरेच नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. 

पीएम आवास योजनाचे फायदे 

  • ग्रामीण भागातील तसेच सपाट भागात पक्के घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
  • तसेच ग्रामीण भागातील डोगरळ भागात पक्के घर बांधण्यासाठी 1,30,000 रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे. 
  • त्याचबरोबर या योजनेतर्गत घराचे अधिक वाढीव बांधण्यासाठी 3% व्याजदरावर कर्ज देखील उपलब्ध करण्यात येत आहे. 

पीएम आवास योजना ग्रामीण पात्रता अटी 

PMAY-G (PM Awas Yojana Gramin) योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारद्वारे काही पात्रता अटी ठरवण्यात आलेल्या आहेत. ज्या नागरिक खालील पात्रता अटीची पूर्तता करतील अश्या सर्व कुटुंबाना या योजनेतर्गत केंद्र सरकारद्वारे पक्के घर बांधून देण्यात येणार आहे. 

  • अर्जदार भारत देशातील रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखाली असावे आवश्यक आहे. 
  • अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे. 
  • त्याचबरोबर अर्जदार निराधार असल्यास अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. 
  • तसेच अर्जदाराचे पक्के घर बांधलेले नसावे. 

वरील पात्रताची पूर्तता पूर्ण करणारे सर्व नागरिक या योजनेतर्गत अर्ज करून पक्के घर मिळवू शकतात.

पीएम आवास योजना ग्रामीण आवश्यक कागदपत्र 

या योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी PM Awas Yojana Gramin Required Document (पीएम आवास योजना ग्रामीण आवश्यक कागदपत्र) ची यादी पुढीलप्रमाणे आहे. 

  • अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट)
  • पत्याचा पुरावा (आधार कार्ड) 
  • रेशन कार्ड 
  • उत्पन्न दाखला 
  • जॉब कार्ड 
  • स्वच्छ भारत मिशन क्रमांक (असल्यास)
  • बँक पासबुक 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • स्वघोषणा प्रमाणपत्र 
  • ग्रामपंचायत प्रस्थाव 

वरील सर्व कागदपत्र पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. 

पीएम आवास योजना ग्रामीण ऑनलाईन अर्ज – PM Awas Yojana Gramin Online Apply 

PM Awas Yojana Online Apply करण्यासाठी राज्य सरकारद्वारे अजून कोणतेही पोर्टल सुरु करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज न करता ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. 

पीएम आवास योजना ऑफलाईन अर्ज कसा करायचा? यासंबंधित संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे. खालील माहितीचा वापर करून PM Awas Yojana Gramin Apply करू शकता. 

Step 1:- सर्वात आधी तुम्हांला वरी दिलेले सर्व कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. 

Step 2:- त्यानंतर सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कडून ग्रामपंचायत कार्यालयात सर्व कागदपत्र जमा करा. 

Step 3:- कागदपत्र जमा केल्यानंतर ग्रामसेवक व सरपंच हे ग्रामसभा घेऊन तुमच्या घरकुल अर्जाचा प्रस्थाव ग्रामसभेत मांडतील. 

Step 4:- ग्रामसभेत प्रस्थाव मंजूर झाल्यानंतर पीएम आवास योजनेसंबंधित अधिकारी तुमच्या जागेची व सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तुमचा अर्ज मंजूर करतील. 

वरील सर्व पायऱ्यांचा वापर करून PM Awas Yojana Gramin Registration (पीएम आवास योजना ग्रामीण अर्ज) करू शकता. 

हे वाचा – PM Kisan Tractor Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदानावर ट्रॅक्टर, पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज झाले सुरु

पीएम आवास योजना ग्रामीण अर्जाची स्थिती कशी पाहावी?

PM Awas Yojana Gramin Form Status जाणून घेण्यासाठी अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती घरबसल्या ऑनलाईन चेक करू शकतात. 

घरबसल्या पीएम आवास योजना अर्ज स्थिती कशी जाणून घेता येते यासंबंधित संपूर्ण माहिती खाली स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. खालील माहितीच्या मदतीने सर्व अर्जदार अर्जाची स्थिती घरबसल्या पाहू शकतात. 

Step 1:- सर्वात आधी पीएम आवास योजना ग्रामीण अधिकारिक वेबसाईट ला भेट द्या. किंवा PM Awas Yojana Gramin Official Website येथे क्लिक करून थेट पेजवर जाऊ शकता. 

Step 2:- आता तुमच्यासमोर पीएम आवास योजना ग्रामीण अधिकारिक वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर वरील मेनू बार मध्ये तुम्हाला “Stakeholder” असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करून “IAY/PMAYG Beneficiary” या पर्यायावर क्लिक करा. 

Step 3:- तुमच्यासमोर पीएम आवास योजना ग्रामीण अर्ज स्थिती पाहायचे नवीन पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला “Registration Number” विचारला जाईल. रेजिस्ट्रेशन नंबर लिहून “Submit” बटणवर क्लिक करा. 

Step 4:- तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल. 

वरील माहितीचा वापर करून पीएम आवास योजना ग्रामीण अर्जाची स्थिती घरबसल्या जाणून घेऊ शकता. 

पीएम आवास योजना रेजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा? 

PM Awas Yojana Gramin Registration Number शोधण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप माहितीचा वापर करून पीएम आवास योजना ग्रामीण रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता. 

Step 1:- PM Awas Yojana Registration Number जाणून सर्वात आधी पीएम आवास योजना अधिकारिक वेबसाईट ला भेट द्या. होम पेजच्या वरील मेनू मध्ये तुम्हाला “Stakeholder” असे लिहिलेले दिसेल. 

Step 2:- यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला “IAY/ PMAYG Beneficiary” यावर क्लिक करा. 

Step 3:- अर्जाची स्थिती जाणून घेण्याचे पेज ओपन होईल, या पेजच्या खालील बाजूस तुम्हाला “Advance Search” असे लिहिलेले दिसेल यावर क्लिक करा. 

Step 4:- आता तुम्हाला राज्य, ब्लॉक, योजनेचे नाव आणि त्याखाली नावंनुसार शोधा या पर्याय वर क्लिक करून त्याखाली जिल्हा, ग्रामपंचायत, रेशन कार्ड नंबर, वडिलांचे नाव/पतीचे नाव किंवा खाते नंबर अशी सर्व माहिती भरून “शोधा” बटणवर क्लिक करा. तुमचा अर्ज मंजूर करण्यात आली असेल तर तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर तुम्हांला दिसेल. 

अश्याप्रकारे तुम्ही अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी रेजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता. 

पीएम आवास योजना ग्रामीण हेल्पलाईन नंबर 

PM Awas Yojana Gramin Helpline Number वर संपर्क करून तुम्ही आवास योजनेसंबंधित काही अडचण येत असेल तर अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. 

योजनेचे नाव हेल्पलाईन नंबर ई-मेल 
पीएम आवास योजना ग्रामीण 1800-11-6446 (Toll Free Number)support-pmayg@gov.in
PFMS 1800-11-8111 (Toll Free Number)helpdesk-pfms@gov.in

FAQs – पीएम आवास योजना ग्रामीण संबंधित विचारले जाणारे प्रश्न.

1) पीएम आवास योजना ग्रामीण काय आहे? 

देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना त्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये पीएम आवास योजना ग्रामीण ची घोषणा केली आहे. 

2) PM Awas Yojana Gramin यापुढे चालू राहणार का?

होय, पीएम आवास योजना ग्रामीण योजनेसाठी अर्थमंत्री यांनी 2024 च्या अर्थसंकल्पमध्ये पीएम आवास योजना यापुढे अजून 5 वर्ष सुरु ठेवण्यासाठी अतिरिक्त 2 कोटी घरे बांधण्याची घोषणा केली आहे.

3) पीएम आवास योजना ग्रामीण व पीएम आवास योजना शहरी या दोन्ही मध्ये काय फरक आहे?

पीएम आवास योजनेतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाना पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच पीएम आवास योजना शहरी अंतर्गत शहरी भागातील गरीब नागरिकांना स्वस्त दरात पक्के घर उपलब्ध करून दिले जातात. 

Conclusion 

तर मित्रांनो आज आपण या लेखच्या मदतीने पीएम आवास योजना ग्रामीण बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. PM Awas Yojana Gramin संबंधित काही अडचण किंवा काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. 

2 thoughts on “PM Awas Yojana Gramin : पीएम आवास योजना ग्रामीण 2024 अर्ज झाले सुरु, असा करा अर्ज”

Leave a Comment