Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 | शेळी पालन शेड अनुदान योजना 2024 | शेड बांधण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान.

Spread the love

Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 – नमस्कार शेतकरी मित्रांनो “सरकारी योजना ब्लॉग” या लोकप्रिय वेबसाईट मध्ये स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी शेळी पालन शेड अनुदान योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेळीपालन शेड अनुदान योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शेळीपालन करून स्वतःचे उत्पन्न वाढवू शकतात.

Shelipalan Shed Yojana Maharashtra राज्यातील बरीच लोकसंख्या शेती करत आहे, त्याचबरोबर शेतकरी पूरक व्यवसाय करत आहेत. जसे – शेळीपालन, दुधाळू जनावरे पालन, दुधव्यवसाय असे अनेक जोड धंदे करताना दिसत आहे.

आपण shelipalan करण्यासाठी शेड बांधण्यासाठी अर्ज करून शासनाकडून अनुदान मिळवू  शकतो. तर आज आपण या लेख मध्ये शेळीपालन शेड अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा? किती लाभ मिळणार आहे? कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 Overview

योजनाचे नावशेळी पालन शेड अनुदान योजना (Sheli Palan Shed Anudan Yojana 2024)
शासनराज्य शासन
चालू वर्ष2024
उद्देशशेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसाय करण्यास आर्थिक मदत करणे
लाभार्थीशेळीपालन करण्यास इच्छुक असणारे राज्यातील सर्व शेतकरी
अधिकारीक वेबसाईट

शेळीपालन व्यवसाय

शेळीपालन व्यवसाय करून आपण दूध, मांस, तसेच त्यांची त्वचा विकून पैसे कमावू शकतो. देशात गाय, म्हैस पालन बरोबरच शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून केलेला आपण तर पाहतच आहोत. परंतु आजच्या या आधुनिक काळात पूर्वी च्या पद्धतीने शेती करून अधिक नफा मिळवला जाऊ शकत नाही हे तर आपल्याला माहिती आहेच. शेती करताना आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास आपण भरपूर नफा मिळवू शकतो.

त्याच प्रमाणे शेळीपालन व्यवसाय करत असताना आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक नफा मिळवणे गरजेचे आहे. आजपण देश्यातील बऱ्याच ठिकाणी शेळीपालन व्यवसाय करत असताना पूर्वीच्या पद्धतीचा वापर केलेला दिसून येत आहे.

शेळीपालन हा व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक तर अत्यंत कमी लागते परंतु या व्यवसायामध्ये नफा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हा व्यवसाय देशात लोकप्रिय होत असताना दिसत आहे. नियोजन करून शेळीपालन व्यवसाय केल्यास आपण हा व्यवसाय कोठेही करू शकतॊ. जसे – डोंगराळ प्रदेश. 

हे वाचा – Old Age Pension Yojana 2024 Latest – महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2024 ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्र, लाभार्थी पात्रता.

Sheli palan करण्यासाठी उस्मानाबादी, संगमनेरी, ब्लॅक बंगाल, जमनापारी शेळी यापैकी कोणत्याही एका जातीच्या शेळीची निवड करून शेळी पालन केल्यास अधिक फायदेशीर शेळीपालन होईल. कारण या सर्व जातीच्या शेळींचे पालन करण्यासाठी खर्च कमी येतो आणि या शेळी कोणत्याही वातावरणात लवकर जुळवून घेतात.

त्यामुळे यांपासून मिळणार उत्पन्न पण मोठ्या प्रमाणात होते. कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही वातावरणात करता येणार हा एक महत्वाचा व्यवसाय आहे. शेळीपालन करून आपण दूध आणि मांस तर मिळवू शकतो त्याच बरोबर शेळी खताची मागणीही बाजार भरपूर प्रमाणात केली जात आहे.

शेळीपालन शेड बांधणी 

शेळीपालन करत असताना त्यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या शेडचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास शेळी आणि मेंढी यांचे आरोग्य तर चांगले राहते पण त्याचबरोबर त्यांचे वाया जाणारे मूत्र आणि लेंढी याचे साठवणूक करून त्याचा वापर आपण शेतखत म्हणून करून आपले उत्पन्न वाढण्यास मदत होते.

शेळीपालन करण्यासाठी शासनाकडून 10 शेळी मेंढी खरेदीसाठी अनुदान तर मिळत आहे परंतु Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 अंतर्गत शेळीपालन करण्यासाठी शेड बांधण्यासाठी सुद्धा शासनाकडून अनुदान वाटप केले जात आहे. सामान्य शेतकरी स्वतः 10 शेळीचा गट खरेदी करू शकत नाही आणि कमी शेळी खरेदी केल्यास हा व्यवसायतुन मिळणारा नफा खुपच कमी होतो. यामुळे किमान 10 शेळींची खरेदी करून शेळीपालन केल्यास अधिक फायदेशीर होऊ शकते. 

वरील सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 अंतर्गत शेळीपालन करण्यासाठी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेळी आणि मेंढी खरेदी केल्यानंतर त्यांच्या साठी शेड बांधणे गरजेचे आहे. शेळीपालन करत असताना 10 शेळींसाठी एक शेड बांधण्यासाठी कमीत कमी 50 हजार खर्च येतो.

भूमिहीन किंवा कमी शेती असणारे शेतकऱ्यांसाठी 50000 चे शेड बांधणे शक्य होत नाही त्यामुळे सरकारने शेळीपालन शेड बांधण्यासाठी देखील अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेळीपालन शेड बांधत असताना सिमेंट, विटा आणि लोखंडी सळया यांचा वापर केला जातो. 

शेळीपालन शेड दोन प्रकारचे असतात बंधिस्त शेळीपालन शेड आणि  मुक्त शेळीपालन शेड असे शेळीपालन शेड चे प्रकार आहेत.   

शेळीपालन शेड अनुदान योजना (Sheli Palan Shed Anudan Yojana 2024

महाराष्ट्र राज्य शासनाने 2021 मध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला मान्यता दिली असून Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 अंतर्गत राज्यातील शेतकरी गाय म्हैस गोठा अनुदान योजना तसेच शेळीपालन शेड अनुदान योजना (Shelipalan Shed yojana 2024) आणि कुकुटपालन शेड अनुदान योजनेचा लाभ घेऊन जनावरांसाठी शेड बांधून अधिक नफा कमावू शेतात.

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना दिसत आहे. परंतु त्यांपासून योग्य तो नफा मिळत नसल्याने शेतकरी अधिक गरीब होत आहेत त्यामुळे जनावरांसाठी शेड बांधणे त्यांच्यासाठी शक्य होत नाही या सर्वांचा विचार करता राज्य शासनाने शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला मान्यता दिली आहे.

Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती सोबत इतर शेतीपूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. नियोजन विभागाच्या 2020 च्या शासन पत्रिकेत पेज क्र. 9 मधील अनुक्रमांक 76 नुसार शेळीपालन करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या शेत साठी 49824 रुपये म्हणजेच 100% एवढे अनुदान देण्यात येणार आहे.

शेड बांधण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाचा तपशील मध्ये अकुशल खर्च 4284 रुपये याप्रमाणे 8% तर कुशल खर्च हा 45000 रुपये या प्रमाणे 92% असा शेड बांधण्यासाठी एकूण खर्च 49824 रुपये एवढा खर्च येऊ शकतो. त्याचबरोबर शेड बांधण्यासाठी सिमेंट, विटा आणि लोखंडी सळया यांचा वापर केला जाऊ शकतो. 

लागणारे कागदपत्र 

  • अर्जदाराचे आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • उत्पन्न दाखल 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • जॉब कार्ड 
  • मतदान कार्ड 
  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • ग्रामसेवक शिफारस दाखला 
  • 7/12 व 8अ 
  • बँक पासबुक 
  • शेडचे काम ग्रामपंचायत चालू वार्षिक आराखडा बजेट मध्ये समाविष्ट असल्यासंबंधित ग्रामपंचायत चे प्रमाणपत्र 
  • शेड बांधणीच्या जागेचा फोटो 
  • ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक यांचा स्थळ पाहणीचा अहवाल  

शेळी पालन शेड अनुदान योजना लाभ

शेड बांधण्यासाठी एकूण 49824 रुपये एवढा खर्च येत असल्याने नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 योजनेचा 100% अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यातील एकूण खर्चापैकी 4824 रुपये अकुशल खर्च तर 45000 रुपये कुशल खर्च एक शेड बांधण्यासाठी येतो.

शेळीपालन शेड अनुदान अर्ज कोठे करायचा?

Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 online form तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिळेल तो अर्ज योग्य प्रकारे भरून वरील सर्व कागदपत्र जोडून तो अर्ज पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावा लागेल. ग्रामसेवक आणि सरपंच तुमचा ठराव ग्रामसभेत मांडून ठराव मंजून करून घेतील.

ठराव मंजून झाल्यानंतर तो अर्ज पडताळणीसाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे पटवला जाईल, त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यास अनुदानाची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. 

FAQ – शेळी पालन शेड अनुदान योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 लाभ कोणत्या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे?

शेळीपालन शेड अनुदान योजनेचा लाभ शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. 

Sheli Palan Shed Anudan yojana ची सुरुवात केव्हा करण्यात आली?

शेळीपालन शेड अनुदान योजनेची सुरुवात 2021 मध्ये शरद पवार यांच्या ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यासंबंधित 12 डिसेंबर 2021 रोजी सुरु करण्यात आली आहे.

शेळीपालन शेड बांधण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा वापर करणे आवश्यक आहे?

Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 योजनेअंतर्गत शेळीपालन करताना शेड बांधण्यासाठी सिमेंट, विटा तसेच लोखंडी जाळी चा वापर करणे आवश्यक आहे.

Shelipalan Shed Yojana Maharashtra अंतर्गत किती लाभ मिळत आहे?

शेड बांधण्यासाठी एकूण 49824 रुपये एवढा खर्च येत असल्याने नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा 100% अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यातील एकूण खर्चापैकी 4824 रुपये अकुशल खर्च तर 45000 रुपये कुशल खर्च एक शेड बांधण्यासाठी येतो. 

शेळीपालन शेड अनुदान योजनेचा अर्ज कोठे आणि कसा करायचा आहे?

शेळी पालन शेड अनुदान 2024 अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी या योजनेचा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

Conclusion:-

तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी शेळीपालन शेड अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. Sheli Palan Shed Anudan Yojana 2024 या योजने संबंधित काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याचबरोबर हि माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना हि माहिती नक्की पटवा. धन्यवाद. 

Leave a Comment