New Havaman Andaj Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहिती आहेच कि, यावर्षी पाऊस वेळेवर सुरु झालेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांची पेरणी देखील वेळेवर झालेली आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालेले दिसून येत असल्याने सर्व शेतकरी हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी काही तरी अंदाज लावावा अशी मागणी करत आहेत.
आता पंजाबराव डख यांनी ऑगस्ट महिन्यात कोणत्या दिवशी पाऊस पडणार आहे व कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. यासंबंधित अंदाज वर्तवला असून त्यांचे संपूर्ण अंदाजची माहिती या लेखच्या मदतीने जाणून घेणार आहोत.
ऑगस्ट महिन्यातील नवीन हवामान अंदाज
जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. वेळेवर आणि जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने खंड पाडण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
त्याचबरोबर राज्यातील बऱ्याच भागामध्ये तर चक्क पाऊस बंद झालेला दिसून येत असताना आताच महाराष्ट्र राज्याचे हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल काही महत्वाचे अंदाज लावलेले आहेत. भारतीय हवामान खात्याने तर महाराष्ट्र राज्यामधील काही ठराविक भागामध्ये पावसाने विश्रांती घेतली असल्याने त्या भागात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात होणार असल्याचे सांगितले आहे.
लाडकी बहीण योजना पात्रता यादी झाली जाहीर, पहा यादी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मध्ये महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्ट महिन्यात सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज लावला आहे.
पंजाबराव डख यांचे ऑगस्ट महिन्यातील हवामान अंदाज
राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असल्याने राज्यामध्ये सध्या वेगळे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता पाऊस बंद होणार अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. परंतु आता प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी राज्यातील हवामानसंबंधित नवीन अंदाज वर्तवला आहे.
याच हवामान अंदाजचा शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.
आतापर्यंत पंजाबराव डख यांनी दिलेले सर्व हवामान अंदाज खरे ठरल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजावर विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पंजाबराव डख यांच्या अंदाजाकडे लक्ष लागून राहिले आहे.
सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस सुरु राहणार आहे. त्याचबरोबर आगस्ट महिन्यात पाऊस हा दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजेच भाग बदलत पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कापूस व सोयाबीन अनुदान झाले मंजूर पहा लवकरच बँक खात्यात पैसे जमा होणार
या चालू महिन्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाऊस बंद होणार नाही, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. तसेच राज्यामध्ये 15 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यातील नाशिक, मुंबई, अहमदनगर, पुणे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये पाऊस भाग बदलत पडणार असून याव्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यातील पावसाचे हवामान
राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. परंतु पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झालेली दिसून येत आहे.
हेही वाचा :-
फवारणी पंप खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
सुशिक्षित तरुणांना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाख रुपये.
शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य सरकार देणार 75000 रुपये
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यामध्ये पावसाचा खंड पडणार नसून अजून 15 दिवस पाऊस थांबणार नाही असे आश्वासन पंजाबराव डख यांनी दिलेले आहे.
Disclaimer
तर मित्रांनो तुम्हांला पंजाबराव डख यांच्या अंदाजावर विश्वास आहे का? आणि त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पाऊस पडेल का? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर सरकारी योजना संबंधित नवीन अपडेट घरबसल्या मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअँप बटणवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.