Ladki Bahin Yojana Beneficiary Update : आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही; मग लगेच करा हे काम तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये.

Spread the love

Ladki Bahin Yojana Beneficiary Update : लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत जमा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. परंतु राज्य सरकारने राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे. 

परंतु राज्यातील अश्या बऱ्याच महिला आहेत, ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचे दिसून आल्याने त्या सर्व महिलांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ (Ladki Bahin Yojana Beneficiary Update) दिला जाणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. 

लाडकी बहीण योजना अपात्र महिला 

Ladki Bahin Yojana Beneficiary Update आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेल्या महिलांनी बँकेत धाव घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु बँकेत मोठी गर्दी असल्याने बँकेद्वारे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अवघड झाले आहे. 

आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी बँकेच्या लांब रांगेत उभा राहण्याची अजिबात गरज नाही, कारण सध्या मोबाईलवर घरबसल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे सोपे झाले आहे. आणि त्यासाठी 1 रुपया देखील खर्च करण्याची गरज नाही. 

लाडकी बहीण योजना पात्र महिला यादी येथे पहा.

घरबसल्या मोबाईलच्या मदतीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे? याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखच्या मदतीने देणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

Ladki Bahin Yojana Beneficiary Update

महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या (Ladki Bahin Yojana Beneficiary Update) बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. 

हे महत्वाचे कागद अपलोड केले तरच मिळणार लाडकी बहीण योजनाचा लाभ, कागदपत्र यादी येथे पहा.

परंतु राज्यातील अश्या बऱ्याच महिला आहेत, ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाकी किंवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे पण अर्ज करताना वेगळ्या बँक खात्याचे पासबुक अपलोड केले आहे. अश्या सर्व महिलांनी लवकरात लवकर आधार कार्ड लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना अपलोड केलेल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे गरजेचे आहे. 

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक (Ladki Bahin Yojana Beneficiary Update) करण्यासाठी एक महत्वाचे पोर्टल सुरु केले असून या पोर्टलच्या मदतीने घरबसल्या मोबाईलच्या मदतीने 1 रुपया देखील खर्च न करता मोफत आधार कार्ड लिंक करता येणार आहे. तेही आपल्या पाहिजे त्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करता येणार आहे. 

आधार कार्ड बँक खात्याशी कसे लिंक करायचे? यासाठी खालील स्टेप चा काळजीपूर्वक वापर करा. 

  1. सर्वात आधी गूगल “NPCI” असे लिहून सर्च करा. त्यानंतर पहिल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर NPCI ची अधिकारिक वेबसाईट “npci.org.in” ही वेबसाईट ओपन होईल.
  2. आता तुम्हाला खाली “Consumer” असे लिहिलेले दिसेल, यावर क्लिक करा. 
  3. त्याखाली वेगवेगळे पर्याय ओपन होतील, यामधील “Bharat Aadhaar Seeding Enabler’ असे लिहिलेले त्यावर क्लिक करा. 
  4. तुमच्यासमोर नवीन अर्ज ओपन होईल, यामध्ये सर्वात वरील बाजूस तुमचा आधार नंबर लिहून त्याखील “Seeding” पर्याय निवडा. त्याखाली तुमची कोणती बँक लिंक करायची आहे ते निवडून दोन वेळेस अकाउंट नंबर लिहा. 
  5. त्यानंतर त्याखाली छोटा बॉक्स त्यावर टिकमार्क करून खालील कॅप्चर कोडं आहे तसा लिहा आणि “PROCEED” बटणवर क्लीक करा. 

आता 2 ते 3 दिवसात तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले असेल, आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. 2 ते 3 दिवसांनी My Aadhaar वेबसाईट वर जाऊन आधार कार्ड लिंक झाले आहे का? चेक करू शकता. 

लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँक खात्याही लिंक आहे का असे चेक करा.

Disclaimer 

या लेखच्या मदतीने आम्ही तुम्हाला घरबसल्या मोबाईलच्या मदतीने 1 रुपया खर्च न करता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करायचे? याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. (Ladki Bahin Yojana Beneficiary Update) तुम्हाला हा लेख कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याच बरोबर लेख आवडल्यास आपल्या इतर मित्रांना नक्की पाठवा. 

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Beneficiary Update : आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही; मग लगेच करा हे काम तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये.”

Leave a Comment