Ladki Bahin Yojana 1st Installment : महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा नारिशक्ती दूत अँप द्वारे ऑनलाईन अर्ज केलेला आहे, त्या महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता राज्यातील महिलांची प्रतीक्षा समाप्त होण्याची वेळ आलेली आहे.
आज पासून Ladki Bahin Yojana 1st Installment मध्ये पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये लाडकी बहीण योजना पहिला हप्ता जमा करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता, परंतु यावर सुप्रीम कोर्टाने इशारा मागे घेल्याने राज्य सरकारने ताबडतोब लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजना पहिला हप्ता
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता, परंतु हा इशारा सुप्रीम कोर्टाने मागे घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारने आता ताबडतोब लाडकी बहीण योजनेचा पहिल्या हप्त्याचे 3000 रुपये बँक खात्यात जमा करण्यास सुरु केले आहे.
राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थबजेट मध्ये Ladki Bahin Yojana राबविण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि त्यासंबंधित नारिशक्ती दूत अँपच्या मदतीने ऑनलाईन देखील मागवलेले आहेत. परंतु राज्यामध्ये सर्वत्र या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने नंतर सरकारने नारिशक्तीदूत अँप द्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंद केले आहे. आणि लाडकी बहीण योजना पोर्टल 2.0 लॉच करून आता या पोर्टलच्या मदतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजना पोर्टल 2.0 मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करा येथे पहा.
ज्या महिलांनी नारिशक्ती अँप द्वारे ऑनलाईन अर्ज केलेला आहे. अश्या महिलांची पात्रता यादी देखील राज्य सरकारने जाहीर केली आहे. या यादीमध्ये ज्या महिलांचे नाव आहे, अश्या सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट अश्या दोन्ही महिन्याचे मिळून एकदम 3000 रुपये बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
Ladki Bahin Yojana 1st Installment
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी Ladki Bahin Yojana 1st Installment चा ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि त्यानंतर अर्ज मान्य झालेली पावती अंगणवाडी सेविका, किंवा बचत गट अध्यक्ष यांच्या कडे जमा केलेले आहे. अश्या सर्व महिलांच्या बँक खात्यात दिनांक 14 ऑगस्ट पासून पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजना पात्रता यादी येथे पहा
परंतु या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा (Ladki Bahin Yojana 1st Installment) लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे अत्य आवश्यक असल्याने निर्देश राज्य सरकारने दिले आहे.
ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लिंक न केल्यास अश्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? येथे पहा
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केल्याने राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुप्रीम कोर्ट आदेश
राज्य सरकारने पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरणातील व्यक्तीला जमिनीचा मोबदला न दिल्याने सुप्रीम कोर्टाने थेट लाडकी बहीण योजनेवर वार करून ही योजना बंद करण्याचा इशारा दिला होता.
परंतु राज्य सरकारने जमीन अधिग्रहण प्रकरणावर महत्वाचा निर्णय घेतल्याने, आता लाडकी बहीण योजना पूर्वी सारखी सुरु ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने Ladki Bahin Yojana 1st Installment चे पैसे जमा करण्यास ताबडतोब सुरुवात केली आहे.
जमीन अधिग्रहण प्रकरण नेमक काय आहे येथे पहा.
Disclaimer
तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला मिळाला असेल, कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ज्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला त्यांच्या बँक खात्यात 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान जमा करण्यात येणार असल्याने चिंता करण्याचे अजिबात कारण नाही.