E Pik Pahani Online Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो “सरकारी योजना ब्लॉग” वेबसाईटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या आधुनिक काळात आपले सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी नवीन योजना राबविताना आपण पाहताच आहोत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार वारंवार खंबीर पणे उभे आहे. आज आपण या ठिकाणी ई पीक पाहणी नोंदणी 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे ई पीक पाहणी काय आहे? ई पीक पाहणी करण्याचे फायदे काय आहेत? E Pik Pahani Online Maharashtra करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? अश्याच अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही अजून आपल्या शेताची ई पीक पाहणी नोंदणी 2024 केली नसेल तर तुमचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली असल्याने लवकरच आपल्या शेताची ई पीक पाहणी नोंदणी 2024 करून घ्या आणि होणारे नुकसान टाळा. जर तुम्हाला e pik pahani online registration करण्यास काही अडचण येत असेल किंवा ई पीक पाहणी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
E Pik Pahani Online
पोर्टलचे नाव | ई पीक पाहणी नोंदणी 2024 (E Pik Pahani Online Maharashtra) |
शासन | केंद्र शासन |
लाभार्थी | सर्व शेतकरी |
चालू वर्ष | 2024 |
E Pik pahani App Download Link | E Pik Pahani App |
ई पीक पाहणी 2024 (E Pik Pahani Online Maharashtra)
E Pik Pahani Online Maharashtra महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक केले असून या पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात कोणत्या पिकाची पेरणी करण्यात आली आहे? त्याचबरोबर राज्यात कोणती नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई देण्यासाठी मदत होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी E Pik Pahani App च्या मदतीने ई पीक पाहणी करून घ्यावी.
ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यास अडचण येत आहे, त्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा होणार आहे. हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचून तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या मदतीने आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी करू शकता.
E Pik Pahani Online Maharashtra चे फायदे (Benefits Of E Pik Pahani)
E Pik Pahani Online Maharashtra अनेक फायदे आहेत, त्यातील काही महत्वाचे फायदे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. याची यादी खाली दिलेली आहे.
- 1) यावर्षी कोणत्या पिकाची पेरणी जास्त प्रमाणात करण्यात आली आहे, हे शासनाला समजण्यास मदत होते.
- 2) कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असल्यास पिकांवर कोणते पर्याय वापरावे जेणे करून पिकांचे नुकसान कमी होईल हे समजण्यास मदत होते.
- 3) सर्व पिकांची माहिती थेट सरकारपर्यंत पोहचत असल्याने शेतकऱ्यांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक न होता शेतकऱ्यांना थेट मदत मिळते.
- 4) मागील अनेक वर्षाच्या पिकांची माहिती जाणून घेऊ शकतो. जसे पिकाची पेरणी, कोळपणी, पीक काढणे इत्यादी. सर्व माहिती जाणून घेता येते.
- 5) पीक विमा मिळण्यासाठी मदत होते.
वरील सर्व ई पीक पाहणीचे फायदे आहेत.
ई पीक पाहणी नोंदणी 2024 कशी करावी? (E Pik Pahani Online Maharashtra)
घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ई पीक पाहणी करण्यासाठी मोबाईलमध्ये ई पीक पाहणी अँप डाउनलोड करणे गरजेचे आहे. E Pik Pahani App Download कश्याप्रकारे करू शकतो याविषयी सर्व माहिती वरील भागात सविस्तरपणे दिलेली आहे. वरील माहितीच्या आधारे ई पीक पाहणी अँप डाउनलोड करू शकता.
स्टेप 1:- E Pik Pahani App Download केल्यानंतर अँप ओपन करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडण्यास सांगितले जाईल. तुमचा जो महसूल विभाग आहे तो निवडल्यानंतर त्याखालील बाणावर क्लिक करा.
स्टेप 2:- तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये “शेतकरी म्हणून लॉगिन करा” आणि “इतर” असे दोन पर्याय दिसतील यातील “शेतकरी म्हणून लॉगिन करा” या बटणवर क्लिक करा.
स्टेप 3:- तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचार जाईल. तुमचा मोबाईल नंबर टाकून “पुढे जा” या बटणवर क्लिक करा.
स्टेप 4:- यापूर्वी म्हणजेच मागील वर्षी पीक पाहणी केली असल्यास तुमचे नाव निवडण्याचा पर्याय येईल त्याचबरोबर मागील वर्षी पीक पाहणी केली नसल्यास “नवीन खातेदार तयार करा” असे सांगितले जाईल. याठिकाणी आपण मागील वर्षी पीक पाहणी केली आहे असे गृहीत धरून फक्त पीक पाहणी कशी करावी? याची माहिती पाहणार आहोत. नवीन खातेदार कश्याप्रकारे तयार करावा? याची माहिती खालील भागात दिलेली आहे.
स्टेप 5:- तुमचे नाव निवडून “संकेतांक विसरलात?” या पर्याय वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर तुमचा संकेतांक दिसेल तो आहे तसा बॉक्स मध्ये लिहून पुढे जाण्याच्या बटणवर क्लिक करा.
स्टेप 6:- आता तुमच्यासमोर “पीक माहिती नोंदवा” असे लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक करा.
स्टेप 7:- आता तुमच्या शेतीचा 7/12 नंबर, 8अ नंबर हंगाम, पिकाचा वर्ग, पिकाचे नाव, एकूण लागवडीखालील क्षेत्र आणि पेरणीची तारीख इत्यादी सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि “पुढे जा” बटणवर क्लिक करा.
स्टेप 8:- तुमची पीक पाहनी यशस्वी झाली असे लिहिले दिसेल. त्यानंतर आपणास आपण नोंदणी केलेल्या पिकाचा फोटो आणि शेती मालकाचा पिकांमध्ये उभारून फोटो अपलोड कारण्यास सांगितले जाईल. फोटो अपलोड झाल्यानंतर तुमच्या पिकाची पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण होईल.
अश्या प्रकारे देशातील सर्व शेतकरी घरबसल्या पीक पाहणी करू शकतात.
नवीन खातेदार नोंदणी कशी करावी? (E Pik Pahani Online Registration)
या पूर्वी किंवा मागील वर्षी पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना नवीन खाते तयार करणे गरजेचे आहे. E Pik Pahani Online Maharashtra करण्यासाठी नवीन खातेदार नोंदणी कशी करायची? याची सर्व माहिती सविस्तरपणे खाली दिलेली आहे. खालील स्टेप्सचा वापर करून नवीन खातेदार नोंदणी करता येईल.
स्टेप 1:- सर्वातआधी E pik pahani app download करून अँप ओपन करा त्यानंतर महसूल विभाग निवडण्यास सांगितले जाईल. महसूल विभाग निवडून पुढे जाण्याच्या बाणावर क्लिक करा.
स्टेप 2:- पुढील पेजमध्ये तुम्हाला “नवीन खातेदार नोंदणी करा” असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करून तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि पुढे जाण्याच्या बाणावर क्लिक करा.
स्टेप 3:- आता तुमचे आडनाव, नाव किंवा गट नंबर टाकून “शोधा” बटणवर क्लिक करा.
स्टेप 4:- तुमचे नाव यादीत असेल तर तुमचे नाव निवडा आणि “नोंदणी करा” यावर क्लिक करा.
अश्याप्रकारे घरबसल्या मोबाइलच्या मदतीने नवीन खातेदार नोंदणी करता येते.
FAQ – ई पीक पाहणी संबंधित काही महत्वाचे प्रश्न
E Pik Pahani Online Maharashtra काय आहे?
ई पीक पाहणी हे केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती साठवून ठेवण्यासाठी महसूल विभागातर्गत सुरु केले एक अत्यंत महत्वाचे पोर्टल आहे.
ई पीक पाहणी अँप डाउनलोड करण्यासाठी प्लेस्टोर वर ऑनलाईन डाउनलोड करू शकतो का?
होय, ई पीक पाहणी अँप डाउनलोड करण्यासाठी प्लेस्टोर चा वापर करू शकतो.
ई पीक पाहणी हेल्पलाईन नंबर कोणता आहे?
02025712712 हा ई पीक पाहणी हेल्पलाईन नंबर आहे.
ई पीक पाहणी करण्याचे फायदे काय आहेत?
ई पीक पाहणी (E Pik Pahani Online Maharashtra) केल्याने पीक विमा मिळण्यास मदत होते, त्याचबरोबर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती ने पिकाचे नुकसान झाल्यास लवकर नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.
ई पीक पाहणी अँप च्या मदतीने आपल्या गावातील कोणत्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे ते पाहू शकतो का?
होय, ई पीक पाहणी अँप ओपन केल्यानंतर “गावाचे खातेदारांची पीक पाहणी” असे लिहिलेले दिसेल. या पर्यायवर क्लिक करून आपण आपल्या गावातील कोणत्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे याची माहिती मिळवू शकतो.
Conclusion
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर पीक पाहणी करण्यास काही अडचण येत असेल तर तेही तुम्ही कॉमेंटबॉक्स मध्ये सुचवू शकता.