Ladka Bhau Yojana 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो “सरकारी योजना ब्लॉग” मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण याठिकाणी माझा लाडका भाऊ योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे – Majha Ladka Bhau Yojana काय आहे? कोणकोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात? कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत? त्याचबरोबर या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे? आणि सर्वात महत्वाचे ते म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
तर मित्रांनो आपल्याला माहिती आहेतच कि महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात म्हणजेच ज्यावेळी 2024-25 चे अर्थसंकल्प चे अर्थबजेट घोषित झाले होते तेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारने संपूर्ण राज्यात माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे आता राज्यातील तरुण मुलांसाठी Ladka Bhau Yojana राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladka Bhau Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | माझा लाडका भाऊ योजना 2024 (Ladka Bhau Yojana 2024) |
शासन | राज्य शासन |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील सर्व सुशिक्षित तरुण |
चालू वर्ष | 2024 |
संबंधित संपूर्ण माहिती | Ladka Bhau Yojana 2024 GR |
महाराष्ट्र राज्य शासनाने माझी लाडकी बहीण योजनाप्रमाणे आता राज्यातील सुशिक्षित तरुणांसाठी माझा लाडका भाऊ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असाल, आणि Ladka Bhau Yojana 2024 Online Apply करून महिन्याला 6000 रुपये ते 10000 रुपये मिळवण्यासाठी इच्छुक असाल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा लेख होणार आहे त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्राला देखील ही माहिती नक्की शेयर करा.
Ladka Bhau Yojana 2024
महाराष्ट्र राज्य शासनाने 2024-25 ज्या अर्थबजेट मध्ये जेव्हा राज्यातील तरुण मुली आणि राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर काही विरोधी पक्ष नेते यांनी राज्यात माझा लाडका भाऊ योजना देखील राबविण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे सध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल विचार करून शेवटी Maza Ladka Bhau Yojana 2024 ला महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित तरुणासाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेतर्गत राज्यातील 12 वी पास विध्यर्थ्याला महिला 6000 रुपये तर आयटीआय च्या विध्यार्थ्यांना महिन्याला 8000 रुपये त्याचप्रमाणे पदवीधर मुलांना महिन्याला 10000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
2024-25 च्या अर्थसंकल्प बजेट नंतर सुरु कारण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेनंतर तरुणांमध्ये वाढत चाललेली नाराजगी लक्षात घेता राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात Maza Ladka Bhau Yojana 2024 राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
माझा लाडका भाऊ योजनेचे मुख्य वैशिष्ट्य
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महिला 10000 पर्यंत आर्थिक मदत करून तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत होणार आहे.
- राज्यातील 10 वी पास तरुणाला महिन्याला 6000 रुपये तर पदवीधर तरुणाला 10000 रुपये त्याचप्रमाणे आयटीआय करणाऱ्या तरुणाला महिन्याला 8000 रुपये एवढी आर्थिक मदत मिळणार आहे.
- या योजनेसाठी एकूण 5500 कोटी एवढे बजेट घोषित करण्यात आले असून या योजनेचा लाभ फक्त 6 महिन्यापूरता मर्यादित करण्यात आलेला आहे.
- म्हणजेच या योजनेचा लाभ पुढील 6 महिने मिळणार आहे.
- त्याचबरोबर तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निशुल्क मोफत रोजगार कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
- तसेच आयटीआय करणाऱ्या एकूण 10 लाख तरुणांना 6 महिने मोफत ट्रेंनिंग देण्यात येणार आहे.
- आणि वाणिज्य क्षेत्रातील तरुणांना देखील 6 महिने मोफत ट्रेनिंग मिळणार आहे.
माझा लाडका भाऊ योजना पात्रता अटी
Maza Ladka Bhau Yojana 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही महत्वाच्या पात्रता अटी ठरवलेल्या असून जे तरुण या पात्रता अटी पूर्ण करतील तेच तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. पात्रता अटी पुढीलप्रमाणे –
- सर्वात महत्वाचे अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
- त्याचबरोबर अर्जदार किमान 12 वी पास असणे अत्यंत आवश्यक आहे.
- अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्ष पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त वय हे 35 वर्ष पूर्ण असावे.
- अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.
- त्याचप्रमाणे अर्जदार महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेत असावा.
वरील सर्व पात्रताची पूर्तता करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
Ladka Bhau Yojan 2024 साठी आवश्यक कागदपत्र
माझा लाडका भाऊ योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र (Required Documents of Maza Ladka Bhau Yojana) जवळ असणे गरजेचे आहे. खालील कागदपत्रांची पूर्तता करणारे सर्व अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. आवश्यक कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक पासबुक
- उत्पन्न दाखला
- शिक्षण पूर्ण झालेला पुरावा (मार्कशीट, बोनाफाईट, टीसी इत्यादी)
वरील सर्व कागदपत्र अर्जदाराजवळ असणे गरजेचे आहे. वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
Majha Ladka Bhau Yojana 2024 अंतर्गत अर्ज प्रक्रिया
माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अश्या दोन्हीप्रकारे अर्ज करून लाभ घेता येऊ शकतो. परंतु लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – Ladka Bhau Yojana Website
Maza Ladka Bhau Yojana 2024 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने अजून कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पोर्टल सुरु केले नसून लवकरच ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यानंतर अर्ज कसा करायचा? याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
हे वाचा – PM Awas Yojana Gramin : पीएम आवास योजना ग्रामीण 2024 अर्ज झाले सुरु, असा करा अर्ज
- सर्वात आधी माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकारिक पोर्टल (ladka bhau yojana website) ला भेट द्या. आता तुम्हाला होम पेजवर “New User Registration” असे लिहिलेले दिसेल यावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर ऑनलाईन अर्ज करण्याचा अर्ज ओपन होईल, यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर विचारले जाईल. सर्व माहिती काळजीपूर्वक भरून “पुढे जा” बटानवर क्लिक करा.
- तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला आवश्यक असणारे सर्व कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले जाईल. कागदपत्र अपलोड केल्यानंतर “सबमिट” बटणवर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल वर एक SMS येईल यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
अश्याप्रकारे आपण घरबसल्या Maza Ladka Bhau Yojana 2024 Online Apply करू शकतो.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
माझा लाडका भाऊ योजना 2024 अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील माहितीचा उपयोग करून ऑफलाईन अर्ज करू शकता.
- सर्वात आधी Maza Ladka Bhau Yojana Official Website ला भेट द्या. किंवा आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाणून माझा लाडका भाऊ योजनेचा अर्ज घेऊ शकता.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती भरा. जसे तुमचे नाव, पत्ता मोबाईल नंबर आणि शिक्षण इत्यादी
- त्यानंतर सर्व आवश्यक असणारे कागदपत्र जोडून ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी येथे जमा करा.
अश्याप्रकारे माझा लाडका भाऊ योजनाचा ऑफलाईन अर्ज करता येऊ शकतो.
FAQs – माझा लाडका भाऊ योजनेबद्दल काही महत्वाचे प्रश्न
माझा लाडका भाऊ योजना काय आहे?
राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केलेली अत्यंत महत्वाची योजना आहे.
माझा लाडका भाऊ योजनेतर्गत किती रुपये वाटप केले जाणार आहेत आणि कसे?
माझा लाडका भाऊ योजनेतर्गत राज्यातील सुशिक्षित तरुणांना महिन्याला 6000 रुपये ते 10000 रुपये एवढी आर्थिक मदत राज्य सरकार करणार असून ही सर्व रक्कम लाभार्थी यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
Maza Ladka Bhau Yojana 2024 अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला, शिक्षण संबंधित प्रमाणपत्र जसे गुणपत्रक इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.
लाडका भाऊ योजना कोणत्या राज्यामध्ये रबविण्यात येणार आहे?
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्यात रबविण्यात येणार आहे.
Conclusion
तर मित्रांनो आज आपण याठिकाणी माझा लाडका भाऊ योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. तुम्हांला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना ही माहिती नक्की शेयर करा.
1 thought on “Maza Ladka Bhau Yojana 2024 | माझा लाडका भाऊ योजना 2024 | येथे करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा महिन्याला 10000 रुपये”