Old Age Pension Yojana 2024 – नमस्कार शेतकरी मित्रांनो “स्मार्ट शोध” या लोकप्रिय वेबसाईट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2024 ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील गरीब आणि वयस्कर वृद्ध व्यक्ती साठी राबवली जाणारी अत्यंत महत्वाची योजना आहे.
वृद्धा पेन्शन योजना 2024 अनर्गत राज्यातील गरीब आणि वयस्कर वृद्धा व्यक्तीना आर्थिक मदत म्हणून महिन्यला पेन्शन म्हणून काही ठराविक रक्कम बँक खात्यात जमा केली जात आहे. Old Age Pension Yojana 2024 Maharashtra या योजने अनर्गत वयस्कर व्यक्तींना पेन्शन म्हणून महिन्याला 600 ₹ बँक खात्यात जमा केले जात आहेत.
जर तुम्ही अजून या वृद्धा पेन्शन योजना 2024 चा लाभ अजून घेतला नसेल आणि या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यास इच्छुक असाल तर आज आपण या ठिकाणी वृद्धा पेन्शन योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे या Old Age Pension Yojana 2024 Online Apply कसे करायचे? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागत आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा. या लेखामध्ये तुम्हाला वृध्दा पेन्शन योजना संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
वृद्धा पेन्शन योजना – Old Age Pension Yojana 2024
Maharashtra Old Age Pension Scheme 2024 बद्दल काही सविस्तर माहिती खालील बॉक्स मध्ये दिलेली आहे. सविस्तर माहितीसाठी खालील बॉक्स पहा.
योजनेचे नाव | महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2024 (Old Age Pensio Yojana 2024) |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र |
योजनेचा प्रकार | केंद्रीय योजना |
उद्देश्य | राज्यातील सर्व गरीब आणि वयस्कर व्यक्तीना आर्थिक मदत करणे. |
लाभ (पैसे) | महिना 600₹ (200₹ केंद्र सरकार व 400₹ राज्य सरकार.) |
लाभार्थी | 65 वर्ष वय पेक्षा जास्त वयस्कर व्यक्ती |
चालू वर्ष | 2024 |
अधिकारिक वेबसाईट | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ |
वरील बॉक्समध्ये वृद्धा पेन्शन योजना बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. आता खाली आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ.
वयस्कर व्यक्तींना त्यांचे मूलभूत जीवन जगण्यासाठी मदत होवी म्हणून त्यांच्या बँक खात्यात महिन्याला 600₹ जमा केले जात आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार 200₹ आणि राज्य सरकार 400₹ मदत म्हणून वयस्कर व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करते. महिन्याला 600₹ मिळत असल्याने त्यांना कोणावर अवलंबून न राहता स्वतः चे जीवन जगण्यासाठी मदत होत आहे.
महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना चे उद्धेश
Old Age Pension Yojana 2024 ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे राबवलेली एक अशी योजना आहे, ज्या मध्ये 65 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले वयस्कर व्यक्तींना आर्थिक मदत मिळावी म्हणून सुरु केलेली सर्वात महत्वाची योजना आहे. वयस्कर व्यक्तींना वयस्कर वयात इतर कोणावर अवलंबून न राहता स्वतः चे जीवन जगण्यासाठी मदत होवी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे वृद्धावस्था पेन्शन योजना 2024 ही योजना सुरु केली. वयस्कर व्यक्तींना आत्मनिर्भर करणे हे या योजनेचे उद्देश आहे.
महाराष्ट्र वृद्धावस्था पेन्शन योजना पात्रता.
Old Age Pension Scheme 2024 चा लाभ घेण्यासाठी काही पात्रताचे पालन करणे गरजेचे आहे. खालील दिलेल्या पात्रताचे पालन तुम्ही करत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. Old Age Pension Yojana 2024 साठी कोणकोणत्या पात्रता आहेत ते खाली दिलेले आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
- अर्जदार चे वय 65 वर्ष पेक्षा जास्त असावे.
- अर्जदारकडे स्वतः चे बँक खाते असणे गरजेचे आहे. कारण या योजनेची रक्कम ही अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50000₹ पेक्षा जास्त नसावे.
- घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीं वर नसावा.
- तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी BPL रेशन कार्ड मध्ये नाव असणे गरजेचे आहे.
वरील पात्रताचे पालन तुम्ही करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू नक्की घेऊ शकता.
Old Age Pension Scheme 2024 साठी कागदपत्र.
1) आधार कार्ड
2) बीपीएल रेशन कार्ड
3) जात प्रमाणपत्र
4) उत्पन्न दाखला
5) बँक पासबुक
6) जन्म दाखला
7) पासपोर्ट साईझ फोटो
8) मोबाइल नंबर
वृद्धावस्था पेन्शन योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराजवळ वरील सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रांची झेरॉक्स तयारी करून नक्की ठेवा.
महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2024 ऑनलाइन अर्ज.
वृद्धावस्था पेन्शन योजना 2024 लाभ घेण्यासाठी खालील स्टेपचा वापर करून ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकता.
Step 1:- सर्वात आधी Old Age Pension Scheme 2024 च्या अधिकारीक वेबसाइट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ला भेट द्या.
Step 2:- अर्जदार रेजिस्ट्रेशन करण्यासाठी “नवीन युजर” बटणवर क्लिक करून तुमचा जिल्हा आणि तुमचा चालू मोबाइल नंबर टाकून “ओटीपी मिळवा” बटणवर क्लिक करा.
Step 3:- तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून “रेजिस्ट्रेशन करा” बटणवर क्लिक करा.
Step 4:- त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुमचा जिल्हा आणि मोबाइल नंबर टाकून त्याखालील कॅप्टचर कोड आहे तसा लिहून लॉगिन करून घ्या.
Step 5:- आता “वृद्धा पेन्शन योजना ऑनलाईन रेजिस्ट्रेशन” पर्याय निवडा. तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून “सबमिट” बटणवर क्लिक करा.
Step 6:- कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून वरील सर्व कागदपत्र अपलोड करून “कागदपत्र पडताळणी करा” बटणवर क्लिक करा.
कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असा मॅसेज येईल. त्यानंतर तुम्हाला महिन्याला 600 रुपये पेन्शन सुरु होईल.
FAQ
Old Age Pension Yojana 2024 काय आहे?
वृद्धावस्था पेन्शन योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकार सोबत मिळून राज्यातील वयस्कर व्यक्तीसाठी सुरु केलेली अत्यंत महत्वाची योजना आहे. वयस्कर व्यक्तीना इतर कोणावर अवलंबून न राहता स्वतः आत्मनिर्भर बनून जगावे यासाठी ही योजना रबावली जात आहे. तसेच त्यांना आर्थिक मदत मिळून देणे हे या योजनेचे उद्देश आहे.
महाराष्ट्र वृद्ध पेन्शन योजनाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात?
Old Age Pension Yojana 2024 चा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, BPL रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, मोबाईल नंबर असे कागदपत्र लागतात.
महाराष्ट्र वृद्ध पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थीना आर्थिक मदत म्हणून किती रक्कम मिळते?
महाराष्ट्र वृद्ध पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थीना आर्थिक मदत म्हणून महिन्याला 600₹ एवढी रक्कम मिळते. येथील केंद्र सरकार 200₹ आणि राज्य सरकार 400₹ रक्कम जमा करते.
वृद्ध पेन्शन योजना अंतर्गत कोण कोण अर्ज करू शकते?
वृद्ध पेन्शन योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50000₹ पेक्षा कमी आहे असे व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकता.
परिवारातील कोणताही व्यक्ती सरकारी नौकरी करत असेल तर Old Age Pension Scheme 2024 चा घेता येणार आहे का?
नाही, परिवारातील कोणताही व्यक्ती सरकारी नौकरी करत असेल तर त्या परिवारातील कोणाचं व्यक्ती या Old Age Pension Scheme 2024 चा लाभ घेऊ शकणार नाही.
Conclusion:-
मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून वृद्धा पेन्शन योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? तसेच या योजनेंतर्गत किती लाभ दिला जात आहे? कोणकोण या योजनेसाठी अर्ज करू शकतात? याची सर्व माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला Old Age Pension Yojana 2024 इतर कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याचबरोबर अशीच नवनवीन माहिती घरबसल्या जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता. धन्यवाद !
1 thought on “Old Age Pension Yojana 2024 Latest – महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2024 ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्र, लाभार्थी पात्रता.”