PM Kisan Tractor Yojana 2024:- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहिती आहेच की भारत देश कृषिप्रधान देश आहे. आणि महाराष्ट्र राज्यातील बरीच लोकसंख्या आजही शेती करुन दैनंदिन जीवन जगत आहेत. तसेच केंद्र शासन देशातील शेतकऱ्यांसाठी वारंवार वेगवेगळ्या योजना राबवित असते.
त्याचबरोबर देशातील शेतकरीही या योजनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. आज आपण एका अश्याच योजनाची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पीएम किसान ट्रॅक्टर योजना 2024 ही केंद्र शासनाने सुरु केलेल्या योजनामधील एक अत्यंत महत्वाची योजना आहे, कारण PM Kisan Tractor Yojana 2024 अंतर्गत देशातील शेतकरी 50% अनुदानवर ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे.
तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी PM Kisan Tractor Yojana (पीएम किसान ट्रॅक्टर योजना 2024) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे – पीएम किसान ट्रॅक्टर सबसिडी योजना 2024 काय आहे? कोणकोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात? किती लाभ मिळणार? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती आपण या लेखच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना – PM Kisan Tractor Yojana 2024
PM Kisan Tractor Yojana च्या मदतीने देशातील बऱ्याच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न पूर्ण होत आहेत. भारत देश कृषिप्रधान देश असल्याने देशातील बरेच लोक शेती करत आहेत. परंतु या आधुनिक काळात शेती करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचा उपयोग करून शेती करणे सोपे झाले आहे. देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मुबलक साहित्य नसल्याने शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकत नाहीत.
ट्रॅक्टर हा शेती करण्यासाठी अत्यंत महत्वाचे साहित्य आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीचे बरेच कामे सोपी होत असताना दिसत आहेत. आणि देशातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न आता या पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे पूर्ण होतं आहेत. कारण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान केंद्र शासनाद्वारे दिले जात आहे.
ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये विविध कामासाठी मोठया प्रमाणात केला जात असून विशेषतः पीएम किसान ट्रॅक्टर चा उपयोग अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पीएम किसान ट्रॅक्टरची मागणी अधिक आहे. ट्रॅक्टरमुळे शेतातील बरेच कामे सुलभ आणि सोपे होताना दिसून येत आहे. परंतु काही शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे नसते त्यामुळे केंद्र शासनाने पीएम किसान ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना उद्देश
देशातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या बचत गटाचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे आणि त्यांचे राहणीमान उंचावून अधिक चांगल्या प्रकारे दैनंदिन जीवन जगण्यास मदत व्हावी हे उद्देश समोर ठेवून केंद्र शासनाने या PM Kisan Tractor Yojana राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शासन निर्णय पत्रक क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439/अजाक-1, नुसार दिनांक 6 डिसेंबर, 2012 पासुन सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत 50% अनुदानावर पीएम किसान ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यात येते.
कोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात? – PM Kisan Tractor Yojana Beneficiary
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 या योजनेचा लाभ देशातील अनुसूचित जाती आणि जमातीचे शेतकरी जे बचत गटात सहभागी असतील असे शेतकरी शेती करण्यासाठी किंवा स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी या PM Kisan Tractor Yojana 2024 चा लाभ घेऊ शकतात.
पीएम किसान ट्रॅक्टर सबसिडी योजना 2024 किती लाभ मिळणार?
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अंतर्गत देशातील शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पीएम किसान ट्रॅक्टर सबसिडी योजना चा लाभ घेऊन ट्रॅक्टर खरेदी करून शेती करू शकतात, त्याचबरोबर ट्रॅक्टरचा उपयोग करून अधिक उत्पन्न वाढवू शकतात आणि उच्च दर्जाचे जीवन जगू शकतात.
PM Kisan Tractor Yojana 2024 या योजनेचा लाभ घेऊन आतापर्यंत देशातील बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचे ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न पूर्ण करून योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
PM Kisan Tractor Yojana लाभार्थी पात्रता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने काही नियम व अटी लागू केलेल्या आहेत. जे शेतकरी खालील नियम व अटी चे पालन करून ऑनलाईन अर्ज करतील तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार भारत देशातील रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- स्वयंसहाय्यता बचत गटात आहेत आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिक असावेत.
- ट्रॅक्टर आणि त्यासोबत आवश्यक असणारे साहित्य व त्याची उपसाधने खरेदीची मर्यादा ही रु. 3.50 लाख इतकी असेल.
- वरील मर्यादित रक्कमेच्या 10% हिस्सा स्वयंसहाय्यता बचत गटांनी किंवा अर्जदाराने भरल्यानंतर उरलेली 50% शासकीय अनुदान केंद्र शासन स्वतः भरणार आहे.
कागदपत्र – PM Kisan Tractor Yojana Documents
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- 7/12
- स्वघोषित प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- जातिचा दाखला
- उत्पन्न दाखला
ऑनलाईन अर्ज – PM Kisan Tractor Yojana Online Registration.
Step 1:- सर्वात आधी पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 च्या अधिकारीक वेबसाईट (https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login) ला भेट द्या.
Step 2:- त्यानंतर तुम्हाला होम पेज वर उजव्या बाजूला “नवीन अर्जदार नोंदणी” असे लिहिलेले दिसेल, यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल, यामध्ये अर्जदाराचे नाव, युजर नाव, पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून त्याखाली दिलेला कॅप्चार कोड आहे तसा लिहून “नोंदणी करा” या बटणवर क्लिक करा.
Step 3:- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल, सर्वात आधी “वापरकर्ता आयडी” पर्याय वर क्लीक करा त्यानंतर मागील पेज मध्ये टाकलेले युजर नाव आणि पासवर्ड टाकून कॅप्चर कोड आहे तसा लिहून “लॉगिन करा” बटणवर क्लीक करा.
Step 4:- आता तुमच्यासमोर पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेचा मुख्य अर्ज ओपन होईल, यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, त्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर वर आलेला ओटीपी टाका, आता खाली तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता, वार्षिक उत्पन्न अशी सर्व माहिती योग्य टाका आणि “पुढे जा” बटणवर क्लीक करा.
Step 5:- तुमच्यासमोर या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र अपलोड करण्याचे पेज ओपन होईल, यामध्ये सर्व आवश्यक कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करून “सबमिट करा” बटणवर क्लीक केल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पाठवला जाईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
ऑफलाईन अर्ज – PM Tractor Subsidy Scheme Offline Registration.
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार राहत असलेल्या जिल्ह्याच्या कृषि विभाग कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. कृषि विभाग कार्यालयात अर्ज करून अधिक माहिती घेऊ शकता आणि 50% अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करू शकता.
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेमुळे शेतीविषयक कामे सुलभ व सुखकर होण्यास मदत होईल. शिवाय व्यवसायामधून मिळणारे उत्पादन देखील वाढण्यास मदत होईल असे आश्वासन केंद्र शासनाने दिलेले आहे.
FAQ
PM Kisan Tractor Yojana काय आहे?
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेतर्गत देशातील शेतकरी शेती करण्यासाठी किंवा स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी Tractor Subsidy Scheme चा उपयोग करून ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान मिळवू शकता.
पीएम किसान ट्रॅक्टर सबसिडी योजनाचा लाभ कोणकोणते शेतकरी घेऊ शकतात?
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ भारत देशातील अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी जे बचत गटात सदस्य किंवा इतर कोणत्याही पदावर आहेत असे शेतकरी लाभ घेऊन ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. आणि ट्रॅक्टरचा उपयोग करून स्वतःची शेती करू शकतात किंवा इतर कामे करून उत्पन्न्न वाढवू शकतात.
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेतर्गत लाभार्थीला किती लाभ दिला जात आहे?
PM Kisan Tractor Scheme अंतर्गत देशातील शेतकरी ट्रॅक्टर खरेदी साठी 50% पर्यंत अनुदान मिळवून ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.
CSC सेंटर वर जाणून पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज करू शकतो का?
होय, पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी CSC सेन्टर वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. किंवा घरबसल्या मोबाइलच्या मदतीने अर्ज करण्यासाठी पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अधिकारीक वेबसाईट (https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login) ला भेट देऊन नोंदणी करू शकता.
भारत देशा व्यतिरिक्त इतर देशातील शेतकरी पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
नाही, पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना ही केंद्र शासनाची योजना असल्याने देशा बाहेरील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ नाहीत. देशातील शेतकरी या योजनेची सर्व माहिती जवळील समाज कल्याण कार्यालयात जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.
Conclusion:-
तर शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखच्या माध्यमातून पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे? कोणकोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात? कागदपत्र कोणती लागतात? त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती सविस्तरपणे जाऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आपल्याला या योजनेसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळील समाज कल्याण कार्यालयात जाणून अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि अश्याच महाराष्ट्र केंद्र शासनाच्या इतर योजनाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घरबसल्या माहिती मिळवू शकता. आणि हा लेख तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
1 thought on “PM Kisan Tractor Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदानावर ट्रॅक्टर, पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज झाले सुरु”