Kapus Soyabean Anudan PDF Form : कापूस सोयाबीन अनुदान हे कागदपत्र जमा केले तरच मिळणार अनुदानाचे 10000 रुपये

Spread the love

Kapus Soyabean Anudan PDF Form : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये कापूस व सोयाबीन अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला असून कापूस व सोयाबीन या पिकाच्या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान वाटप करण्याची घोषणा केली आहे. 

मागील वर्षी म्हणजेच 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन पिकाचे उत्पादन केले होते परंतु योग्य बाजार भाव न मिळण्याने ज्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. अश्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करून देण्यासाठी Kapus Soyabean Anudan PDF Form सरकारने अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Kapus Soyabean Anudan PDF Form 

कापूस सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना सहमती पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक नसून स्वतत्र आहे अश्या शेतकऱ्यांनी सहमतीपत्र तर ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे अश्या शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहायकाकडे जमा करायचे आहेत. 

कापूस सोयाबीन अनुदान सहमती पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र (Kapus Soyabean Anudan PDF Form) जमा करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी मागीलवर्षी पीक विमा भरलेला आहे का? याची खात्री करून घ्यावी. त्याचबरोबर पीक विमा भरला असेल तर पीक विमा अर्ज करताना अर्जामध्ये कापूस किंवा सोयाबीन यांची नोंदणी केलेली आहे का? याची देखील खात्री करून घेणे गरजेचे आहे. 

कारण या अनुदानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असावा आणि पीक विमा भरताना अर्जामध्ये कापूस किंवा सोयाबीन या पिकाचा उल्लेख केलेला असेल तर या अनुदानचा लाभ मिळणार आहे. 

कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक लिस्ट

तसेच अर्जदाराचे आधारकार्ड त्याच्या कोणत्याही नॅशनल बँकेत खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. लिंक नसल्यास लवकरात लवकर लिंक करू घेण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिले आहेत. 

कापूस सोयाबीन अनुदान ना हरकत प्रमाणपत्र कसे भरावे?

ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, अश्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (Kapus Soyabean Anudan PDF Form) कृषी सहायकाकडे जमा करणे गरजेचे आहे. त्यांचबरोबर ना हरकत प्रमाणपत्रमध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक करणे तितकेच गरजेचे आहे. ना हरकत प्रमाणपत्रमधील काही माहिती चुकीची भरल्यास या अनुदानचा लाभ त्या शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र न चुकता बरोबर भरणे आवश्यक आहे. 

कापुस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र PDF 

शेती सामायिक असल्यास ना हरकत प्रमाणपत्र PDF 

ना हरकत प्रमाणपत्रामधील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे न चुकता कशी भरायची हे जाणून घेण्यासाठी खालील माहितीचा स्टेप बाय स्टेप वापर करून संपूर्ण अर्ज भरा. 

  • सर्वात आधी वरील बाजूस तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव असे लिहिले दिसेल, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव आणि नंतर गावाचे नाव लिहायचे आहे. 
  • आता त्याखाली तुम्हांला तुमच्या शेताचा गत नंबर लिहायचा आहे. 
  • त्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या नावावर पीक विमा अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीचे नाव सुरवातीला मराठी आणि त्याखाली इंग्रजीमध्ये लिहायचे आहे. 
  • त्याचबरोबर खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर लिहिण्यासाठी बॉक्स दिसेल त्यामध्ये तुमचा आधार नंबर बरोबर लिहा. आणि त्याखालील बॉक्स मध्ये तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर किंवा पीक विमा भरताना दिलेला मोबाईल नंबर लिहा. 
  • त्यानंतर खालील मोठ्या बॉक्स मध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव आणि संमती बाबत सही असे लिहिलेले दिसेल, यामध्ये सामायिक क्षेत्रात असणाऱ्या सर्व खातेदाराचे नाव व त्यांची सही घ्या. आपल्या गट नंबर मध्ये असणाऱ्या सर्व खातेदारांची सही घेणे आवश्यक आहे. 

वरील माहितीचा वापर करून तुम्ही सामायिक क्षेत्रासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्रमधील सर्व माहिती भरून अनुदानाचा लाभ घेऊ शकता. 

Disclaimer 

तर मित्रांनो आपण या लेखच्या मदतीने कापूस सोयाबीन अनुदान योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या सामायिक क्षेत्रातील नागरिकांनी ना हरकत प्रमाणपत्र (Kapus Soyabean Anudan PDF Form) न चुकता योग्य प्रकारे कसे भरायचे? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अश्याच नवनवीन योजनांचे अपडेट्स घरबसल्या मिळवण्याठी खालील व्हाट्सअँप ग्रुप बटणवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता. 

1 thought on “Kapus Soyabean Anudan PDF Form : कापूस सोयाबीन अनुदान हे कागदपत्र जमा केले तरच मिळणार अनुदानाचे 10000 रुपये”

Leave a Comment