Kapus Soyabean Anudan Form PDF : नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकत्याच झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये राज्य सरकारने राज्यातील सर्व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये मागील खरीप हंगामाला म्हणजेच 2023 मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पन्न झाले होते, परंतु या पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Kapus Soyabean Anudan Form PDF सर्व नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.
2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकरी कापूस किंवा सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे, परंतु योग्य भाव न मिळाल्याने चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये कापूस सोयाबीन अनुदान मिळणार थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र – Kapus Soyabean Anudan Form PDF
कापूस व सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले गरजेचे आहे. Kapus Soyabean Anudan Form PDF ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, अश्या नागरिकांनी बँकेत जाऊन लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घेण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी दिले आहे.
त्याचबरोबर या अनुदानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहमतीपत्र (Kapus Soyabean Anudan Form PDF) किंवा शेती सामायिक असल्यास ना हरकत प्रमाणपत्र आपल्या भागातील कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करण्यास सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही सहमतीपत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर जमा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र PDF
कापूस सोयाबीन अनुदान ना हरकत प्रमाणपत्र PDF
कापूस सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घेण्याठी आवश्यक असणारे सहमती पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र डाउनलोड करून भरू शकता आणि कृषी सहायकाकडे जमा करू शकता.
कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र कसे भरावे?
कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र (Kapus Soyabean Anudan Form PDF) भरून कृषी सहायकाकडे जमा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सहमती पत्र मधील माहिती भरताना काही चूक झाल्यास ते शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र अचूक कसे भरायचे जाणून घेण्याठी खालील माहितीचा स्टेप बाय स्टेप वापर करून सहमतीपत्र अचूक भरू शकता.
- सर्वात आधी वरील बाजूस तुम्हांला जिल्हा, तालुका व गाव असे लिहिलेले दिसेल या मध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव आणि नंतर गावाचे नाव लिहा.
- त्यानंतर तुम्हाला “शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार (इंग्रजी व मराठी मध्ये)” असे लिहिलेले दिसेल. यामध्ये सुरवातीला तुमचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशी सर्व माहिती मराठीमध्ये भरायची आहे.
- त्यानंतर अजून एकदा तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव अशी सर्व माहिते इंग्रजीमध्ये लिहायची आहे.
- आता तुम्हांला खाली आधार कार्ड नंबर लिहिण्यासाठी बॉक्स दिसेल यामध्ये तुमचा संपूर्ण आधार नंबर लिहायचा आहे.
- त्याखाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहिण्यासाठी बॉक्स दिलेला आहे, यामध्ये तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला किंवा पीक विमा भरते वेळेस दिलेला मोबाईल नंबर लिहा. त्याखाली अर्ज ज्या दिवशी जमा करायचा आहे ती तारीख लिहून उजव्या बाजूला शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव व सही लिहा.
अश्याप्रकारे कापूस आणि सोयाबीन अनुदान सहमतीपत्र अचूक लिहून कृषी सहाय्यकाकडे जमा करा. तुम्हांला नक्की अनुदान मिळून जाईल.
सामायिक खातेदार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र पहा.
Disclaimer
तर मित्रांनो आपण आज या लेखच्या मदतीने कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र अचूक कसे भरायचे? याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. कापूस सोयाबीन अनुदान सहमतीपत्र अर्ज भरताना कोणती काळजी घेवी याची माहिती तुम्हांला मिळाली असेल. तर तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अशीच माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा.
4 thoughts on “Kapus Soyabean Anudan Form PDF : असे भरा कापूस सोयाबीन अनुदान संमतीपत्रक अर्ज, पहा संमतीपत्रक”