Kapus Soybean Anudan Latest Update : राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीन अनुदानाचे 5000 रुपये, राज्य सरकारचे महत्वाचा निर्णय

Spread the love

Kapus Soybean Anudan Latest Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनचे उत्पन्न घेतले आहे, अश्या सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

2023 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन ला अत्यंत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होत्या. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनचे उत्पादन केले आहे अश्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी 5000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

कापूस व सोयाबीन अनुदान योजना 

2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये आर्थिक मदत दिले जाणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी सांगितले आहे. परंतु या अनुदानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा योजना अर्जामध्ये कापूस किंवा सोयाबीन पिकाचा उल्लेख केलेला असावा. आणि शेताची पीक पाहणी करते वेळेस पीक पाहणी मध्ये देखील कापूस किंवा सोयाबीन पिकाचा उल्लेख केलेला असावा. अश्या सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 


हेही वाचा :- 

लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज बंद झाले आता काय करावे. 

लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला आता कर करावे. 


Kapus Soybean Anudan Latest Update

2023 च्या खरीप हंगामामध्ये म्हणजेच मागील वर्षी खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज करते वेळेस पीक पेरामध्ये कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंदणी केलेली आहे आणि शेताची पीक पाहणी अँपद्वारे पीक पाहणी केलेली आहे. अश्याच शेतकऱ्यांना या अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 

तसेच जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करून लिंक करून घेणे गरजेचे आहे. आधार कार्ड व बँक खाते लिंक असेल तर त्यानंतर वैयक्तिक संमतीपत्र हे प्रमाणपत्र कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी सांगितले आहे. 

घरबसल्या ऑनलाईन पीक विमा अर्ज करण्यासाठी येथे पहा. 

कापूस अनुदान योजना हेक्टरी लाभ 

Kapus Soybean Anudan-Latest news

कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 याप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत अनुदान वाटप करण्यात येणार आहे. 

अनुदानची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. परंतु यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँक खाते लिंक असावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अश्या नागरिकांना अक्षर कार्ड व बँक खाते लवकरात लवकर लिंक करून घ्यावे. 

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे अश्या शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र व ज्या शेतकऱ्यांची शेती सामायिक नाही, त्या नागरिकांनी संमतीपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहे. असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी दिले आहेत. 


हेही वाचा :- 

लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेताची पीक पाहणी कशी करावी? 


कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान 

  • कापूस व सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा ऑनलाईन अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. 
  • त्याचबरोबर पीक विमा अर्ज करताना अर्जामध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकांचा समावेश केलेला असावा. 
  • तसेच शेताची पीक पाहणी करताना त्या अर्जमध्ये सोयाबीन किंवा कापूस याच पिकाचा समावेश केलेला असावा. 
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. 
  • त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत लाभ दिला जाणार आहे. 
  • प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान वाटप करण्यात येणार आहे. 

कापूस व सोयाबीन अनुदान सहमती पत्र PDF 

सामायिक खाते असल्यास ना हरकत प्रमाणपत्र PDF 

Disclaimer 

तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर सरकारी योजनासंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता. 

1 thought on “Kapus Soybean Anudan Latest Update : राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीन अनुदानाचे 5000 रुपये, राज्य सरकारचे महत्वाचा निर्णय”

Leave a Comment