Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागवले होते. आणि त्यासाठी सरकारने नारिशक्ती दूत अँप देखील लाँच केला होता आहे. राज्यातील सर्व महिलाचे या अँप द्वारे ऑनलाईन अर्ज भरले जात होते, परंतु मागील काही दिसवासापासून लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज करणे बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे आता नारिशक्ती दूत अँपद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. कारण सरकारने या योजनेचे नवीन पोर्टल सुरु केले असून त्या पोर्टलद्वारे सर्व महिला ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
Ladki Bahin Yojana Latest Update.
राज्य सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मागवण्यास सुरुवात केली होती तेव्हा राज्य सरकारने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती दूत अँप सुरु केला होता. त्याचबरोबर राज्यातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज सादर केले जात होते.
परंतु मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जात असल्याने नारीशक्ती दूत अँप मध्ये अडचण येत होती. त्यामुळे सरकारने अर्जामध्ये बरेच बदल केले. तरी देखील नागरिकांना अर्ज करण्यास अडचण येत होती. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने नारिशक्ती दूत अँप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:- लाडकी बहीण योजना संबंधित संपूर्ण माहिती – लाडकी बहीण योजना 2024
लाडकी बहीण योजना पोर्टलद्वारे अर्ज कसा करावा?
आतापर्यंत ज्या नागरिकांनी आपले अर्ज नारिशक्ती दूत अँप द्वारे भरलेले आहेत, फक्त त्यांनाच नारिशक्ती दूत अँपमध्ये त्यांनी केलेल्या अर्जाची स्थिती पाहता येणार आहेत. त्याचबरोबर ज्या नागरिकांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, त्यांना दुरुस्त करण्याचा पर्याय देखील नारिशक्ती अँपमध्ये देण्यात आलेला आहे.
परंतु आता ज्या नागरिकांना नवीन अर्ज करायचे आहेत, त्यांच्यासाठी सरकारने नवीन पोर्टल सुरु केले आहे. Ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलच्या मदतीने लाडकी बहीण योजनेतर्गत नवीन अर्ज सहजरीत्या भरता येणार आहेत.
लाडकी बहीण योजनाच्या नवीन पोर्टलच्या मदतीने ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती खाली दिलेली आहे.
1) सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये ladakibahin.maharashtra.gov.in ही लिंक ओपन करा. आता तुमच्या समोर लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल ओपन होईल.
2) यामध्ये वरील मेनू मध्ये अर्जदार लॉगिन असे लिहिलेले दिसेल यावर क्लिक करा. तुमच्यासमोर लॉगिन करण्याचा अर्ज ओपन होईल. परंतु लॉगिन करण्यापूर्वी अकाउंट बनवणे गरजेचे असल्याने अकाउंट बनवण्यासाठी त्याच पेज मध्ये खाली तुम्हाला “Create account” असे लिहिले दिसेल, यावर क्लिक करा.
3) आता लाडकी बहीण योजनाचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती योग्य प्रकारे काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती भरा.
4) सर्व माहिती भरल्यानंतर “Sign Up” बटणवर क्लिक करा.
5) Sign Up केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोडं लिहून लॉगिन बटणवर क्लिक करा.
6) आता तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, जन्मठिकाण, अशी सर्व माहिती भरून “Next” बटणवर क्लिक करा.
7) तुमच्या समोर कागदपत्र अपलोड करण्याचा पेज ओपन होईल. यामध्ये आवश्यक असणारे सर्व कागदपत्र अपलोड करून “रेजिस्ट्रेशन करा” या बटणवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर रेजिस्ट्रेशन नंबर पाठवला जाईल, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
अश्या प्रकारे आपण घरबसल्या मोबाईलच्या मदतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकतो.
लाडकी बहीण योजना पात्रता यादी झाली जाहीर येथे चेक करा यादीमधील तुमचे नाव
Disclaimer
या वेबसाईट मध्ये आम्ही तुमच्यासाठी सरकारी योजना संबंधित सर्व नवनवीन अपडेट्स ची माहिती देत असतो. आमची ही वेबसाईट कोणत्याही सरकारचा प्रसार न करता फक्त नागरिकांना सरकारी योजनाबद्दल ज्ञान प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
6 thoughts on “Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहीण योजनाचे ऑनलाईन अर्ज करणे झाले बंद, आता काय करावे पहा.”