Aapli Chawdi नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट शोध वेबसाईट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू शकतो, महसूल विभागाअंतर्गत राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी आपली चावडी नावाचे नवीन पोर्टल सुरु केले असून aapli chavdi पोर्टलच्या मदतीने राज्यातील सर्व नागरिक आपल्या गावातील जमिनीचे सर्व व्यवहाराची माहिती जसे जमीन खरेदी आणि विक्रीचे व्यवहार घरी बसून ऑनलाईन जाणून घेऊ शकतात.
पूर्वी जेव्हा गावातील कोणत्याही जमिनीचे व्यवहार केले जात होते आणि त्यांची माहिती जाणून घेणे अत्यंत अवघड होते, कारण जमिनीचे व्यवहार Property Card झाल्यानंतर त्यासंबंधित माहिती साठी सरपंच व तलाठी यांची भेट घेणे गरजेचे होते.
त्याचबरोबर सर्व माहिती अपडेट होण्यास 15 दिवसाचा कालावधी लागत असत. परंतु आता Aapli Chawdi या पोर्टलच्या मदतीने राज्यातील सर्व नागरिक गावातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची माहिती लगेच ऑनलाईन अपडेट होत अजून आपण सर्व माहिती लगेच मोबाईलच्या मदतीने जाणून घेऊ शकतो.
Aapli Chawdi Overview
पोर्टलचे नाव | आपली चावडी (Aapli Chawdi) |
शासन | राज्य शासन |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
अधिकारी पोर्टल | https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi |
आपली चावडी पोर्टल नक्की काय आहे?
आजच्या या डिजिटल युगात डिजिटल नोटीस बोर्ड चा वापर करून गावातील सर्व व्यवहाराची माहिती जसे जमिनीची विक्री आणि खरेदी यांची सर्व माहिती घरी बसून जाणून घेण्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाअंतर्गत सुरु केलेले महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी महत्वाचे पोर्टल सुरु केले आहे. पूर्वी जेव्हा गावातील कोणत्याही जमिनीची खरेदी किंवा विक्री होत असत तेव्हा महसूल विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथील संबंधित अधिकारी यांची 15 दिवसात हरकत मागविणे गरजेचे होते.
जोपर्यंत आपण महसूल विभागाच्या कार्यालयाला भेट नाही तो पर्यंत कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री आणि त्यासंबंधित माहिती जाणून घेणे शक्य नव्हते, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाच्या निदर्शनाअंतर्गत आपली चावडी नावाचे नवीन पोर्टल सुरु केले.
आता राज्यातील सर्व नागरिक आपली चावडी या पोर्टलच्या मदतीने जमिनीचे फेरफार, मालमत्ता पत्रक आणि शेताची मोजणी यासारखी शेती संबंधित अनेक कामे घरी बसून मोबाईलच्या मदतीने करू शकतात. त्याचबरोबर गावातील जमिनीची नोंदणी, property card आणि जमिनीचे अहवाल यांची सर्व माहिती ऑनलाईन पाहू शकतो.
Aapli Chawdi पोर्टलचे फायदे
- महसूल विभागातर्गत हे आपली चावडी पोर्टल सुरु केले असल्याने यामध्ये दाखवण्यात आलेली सर्व माहिती खरी असते.
- जमिनी संबंधित कोणतेही व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
- कोणत्याही कार्यालयात न जाता घरी बसून फक्त मोबाईलच्या मदतीने सर्व माहिती जाणून घेणे शक्य होते.
- नागरिकांचा वेळ आणि पैसे वाचविण्यास मदत होते.
- जमिनीची नोंद, जमिनीची मोजणी त्याचबरोबर रिअल इस्टेट मध्ये व्यवहार करताना महत्वाचे असणारे प्रॉपर्टी कार्ड (property card) यासंबंधित सर्व माहिती जाणून घेणे सोपे होते.
Aapli Chawdi – सातबारा विषयी माहिती कशी पाहावी?
शेती संबंधित कोणत्याही प्रकारचे व्यवहाराची सर्व माहिती जसे जमिनीची खरेदी-विक्री कशी झाली? कोणत्या जमिनीचे व्यवहार झाले आहेत? फेरफार कोणत्या प्रकारचा वापरण्यात आला आहे? याची सर्व माहिती कशी पाहायची खाली स्टेप बाय स्टेप दिलेले असून खालील पायऱ्यांचा वापर करून सर्व व्यवहार पाहू शकता.
Step 1:- सर्वात आधी आपली चावडी पोर्टलच्या अधिकारीक वेबसाईटला भेट द्या. किंवा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या लिंकवर क्लिक करून थेट पेजला भेट द्या.
Step 2:- त्यानंतर “सातबारा विषयी” हा पर्याय निवडा.
Step 3:- आता तुम्हाला जिल्हा निवडण्यास सांगितले जाईल, तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका आणि गाव निवडून त्याखालील कॅप्चर कोड आहे तसा लिहून “आपली चावडी पहा” या बटणवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला फेरफार नंबर, फेरफार प्रकार, फेरफारची तारीख सर्वे नंबर आणि गट नंबर अशी सर्व माहिती पाहायला मिळेल.
हे वाचा – PM Awas Yojana Gramin : पीएम आवास योजना ग्रामीण 2024 अर्ज झाले सुरु, असा करा अर्ज
Aapli Chawdi – मोजणी विषयी माहिती कशी पाहावी?
जेव्हा शेतीची खरीदी – विक्री केली जाते तेव्हा शेतीची मोजणी करणे अत्यंत गरजेचे असते. तर आता आपण आपली चावडी पोर्टलच्या मदतीने शेतीच्या मोजणी संबंधित सर्व माहिती घरबसल्या कशी जाणून घेऊ शकतो याची माहिती खाली स्टेप-बाय-स्टेप दिलेली आहे. खालील माहितीचा वापर करून तुम्ही घरबसल्या जमिनीच्या मोजणीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
Step 1:- सर्वात आधी aapli chawdi च्या अधिकारीक पोर्टलला भेट द्या किंवा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या लिंकवर क्लिक करून थेट पेजला भेट देऊ शकता.
Step 2:- त्यानंतर वरील “मोजणी” पर्यायावर क्लिक करा. आता खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडण्यास सांगितले जाईल. जिल्हा निवडल्यानंतर तालुका आणि गावचे नाव निवडून त्याखालील कॅप्चर कोड आहे तसा लिहून “आपली चावडी पहा” बटणवर क्लिक करा.
अश्या प्रकारे आपण घरीबसुन आपल्या गावातील कोणत्याही शेतीच्या मोजणी संबंधित माहिती जाणून घेऊ शकतो.
Aapli Chawdi – property card विषयी माहिती कशी पाहावी?
रिअल इस्टेट संबंधित कोणतेही व्यवहार करताना प्रॉपर्टी कार्ड वरील माहितीची महत्वाची भूमिका असते. आपली चावडी पोर्टलच्या मदतीने property card वरील माहिती घरी बसून कश्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. याची सर्व माहिती खाली स्टेप-बाय-स्टेप दिलेली आहे.
Step 1:- सर्वात आधी आपली चावडी अधिकारिक पोर्टल भेट देण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या लिंकवर क्लिक करा.
Step 2:- आता तुमच्या समोर सातबारा (फेरफार), मालमत्ता पत्रक (फेरफार) आणि मोजणी (नोटीस) असे लिहिलेले दिसेल त्यामधील “मालमत्ता पत्रक (फेरफार)” हा पर्याय निवडून तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव यांची निवड करा.
Step 3:- आता खालील कॅप्चर कोडं आहे तसा लिहून “आपली चावडी पहा” बटणवर क्लिक करा.
अश्या प्रकारे आपण मालमत्ता पत्रक ची सर्व माहिती घरबसल्या आपली चावडी पोर्टलच्या मदतीने जाणून घेऊ शकतो.
FAQ – आपली चावडी बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Aapli Chawdi पोर्टल कोणत्या राज्यापुरते मर्यादित आहे?
आपली चावडी हे पोर्टल महसूल विभागातर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने सुरु केले महाराष्ट्र राज्यपुरते मर्यादित आहे.
आपली चावडी पोर्टलच्या मदतीने कोणते कोणते कामे करू शकतो?
आपली चावडी च्या मदतीने जमिनीच्या नवीन नोंदी, जमिनीची मोजणी त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड विषयी सर्व माहिती जाणून घेऊ शकतो.
आपली चावडी अधिकारिक वेबसाईट कोणती आहे?
आपली चावडी ची अधिकारिक वेबसाईट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi ही आहे.
आपली चावडी कोणत्या भाषेत वापर करण्यात येते?
आपली चावडी हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत वापर करण्यात येते.
आपली चावडी वर जमिनी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे?
नाही, आपली चावडी वर जमिनी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे नाही.
Conclusion
तर मित्रांनो आज आपण याठिकाणी आपली चावडी बद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जसे – आपली चावडी म्हणजे काय? या पोर्टलचे फायदे काय आहेत? कोणकोणते कामे करू शकतो? त्याचबरोबर आपली चावडी संबंधित काही महत्वाचे प्रश्न अशी सर्व माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
1 thought on “गावातील जमिनीचे व्यवहार, फेरफार नोटिसा जाणून घ्या फक्त 5 मिनिटात | आपली चावडी | Aapli Chawdi”